Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पाणखोल जुवा बेट | स्व-गणनेत गावाने घडवला आदर्श!

पाणखोल जुवा बेट | स्व-गणनेत गावाने घडवला आदर्श!

सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण ; महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून मोहिमेला अभूतपूर्व यश

मालवण सिंधुदुर्ग : चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरणाऱ्या मालवण तालुक्यातील जुवा पाणखोल गावाने स्व-गणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासनासमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, बेटासारख्या दुर्गम भागात प्रत्यक्ष पोहोचून महसूल प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सर्व कुटुंबांची स्व-गणना यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून हे प्रेरणादायी यश साकार झाले आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात स्व-गणना मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी स्वतःहून डिजिटल माध्यमातून आपली माहिती ऑनलाइन नोंदवावी, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली. जुवा गावातील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहिमेला सकारात्मक साथ दिली. जुवा गावात एकूण २७ घरे असून ३२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावाची एकूण लोकसंख्या ११९ इतकी आहे. या सर्व कुटुंबांनी स्व-गणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवत तालुक्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी मोहिमेचे नियोजन काटेकोरपणे करत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात प्रभावी समन्वय साधला. बेटावरील नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना स्व-गणनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि मदतही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि संपूर्ण गावाने निर्धारित कालावधीत स्व-गणना पूर्ण केली.

शासनाच्या निर्देशानुसार दि. १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना ही माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येत असल्याची माहिती तहसीलदार श्री. लव्हे यांनी दिली. या मोहिमेत कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सरपंच तसेच पोलिस पाटील यांनी सक्रिय सहकार्य केले.

rapan bottom