प्रशालेत ॲरोन संतातोन फर्नांडिस प्रथम.
मालवण | प्रतिनिधी : धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचरा चा निकाल १०० टक्के लागला. या प्रशालेतून 25 विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश प्राप्त केले.

प्रथम क्रमांक ॲरोन संतातोन फर्नांडिस -91.80 टक्के, द्वितीय क्रमांक कव्यांजली संदीप रावले- 88.40 टक्के तृतीय क्रमांक जुई गणेश आचरेकर 85 टक्के या विध्यार्थ्यानी प्राप्त केलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब- मिराशी, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलेश सरजोशी, खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी, सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.

