प्रशालेत कु. साक्षी संजय रावराणे 97.80 टक्के गुण मिळवून प्रथम
मालवण | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. दे टोपीवाला हायस्कूलचा दहावीचा निकाल 98. 55 टक्के लागला. कु.साक्षी संजय रावराणे 97.80 टक्के गुण मिळविण प्रशालेत प्रथम क्रमांक पटकाविला.

यावर्षी अ. शि. दे टोपीवाला हायस्कूलचे 138 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 136 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात द्वितीय कु.हर्ष सुहास पांचाळ 485 गुण 97.00 टक्के, तृतीय. कु. रोशन कैलास साळुंखे 484 गुण 96.80 टक्के, आदित्य समीर बर्डे 483 गुण 96.60 टक्के, कु.संस्कृती मंगेश नाईक 480 गुण 96.00 टक्के, कु. फाल्गुनी मिलिंद हिंदळेकर, 476 गुण 95.20 टक्के, कु. खुशी हनुमंत तोंडवळकर 473 गुण 94.60 टक्के, कु. वैष्णवी मयूर मोचेमाडकर 470 गुण 94.00 टक्के, कु. रुद्र विनायक खानोलकर 470 गुण 94.00 टक्के, कु. कीर्ती संजय बिरमोळे 460 गुण 92.00 टक्के, कु निधी विनायक जाधव 447 गुण 89. 40 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक , शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

