Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा सलग २२ व्या वर्षी १००% निकाल.

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा सलग २२ व्या वर्षी १००% निकाल.

३९ विद्यार्थ्यांना 'डिस्टींक्शन…!'

मालवण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलने १००% यशाची परंपरा कायम राखली आहे. रोझरी इंग्लिश स्कूलच्या १००% निकालाचे हे सलग २२ वे वर्ष आहे.

यावर्षी, रोझरी इंग्लिश स्कूलचे सर्व ५० विद्यार्थी - विद्यार्थीनी १० वी च्या परीक्षा निकालात यशस्वी झाले असून त्यातल्या ३९ जणांना 'डिस्टींक्शन' मिळाले आहे. ९ जण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर २ जण द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत.

रोझरी इंग्लिश स्कूलच्या कु. पार्थ बागवे याने ९७.४०% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांकाच्या कु. मधुरा परब हिला ९६.००% तर तृतीय क्रमांकासाठी कु. वंशिका रावले व कु. समर्थ यादव यांना प्रत्येकी ९५.८०% गुण प्राप्त झाले आहेत.

रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी - विद्यार्थीनींचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

rapan bottom