Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

घुमडे | घुमडाई मंदिराच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्याचा माजी सरपंच दिलीप बिरमोळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ….!

घुमडे | घुमडाई मंदिराच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्याचा माजी सरपंच दिलीप बिरमोळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ….!

घुमडे ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष बाबू बिरमोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

मंदिरात 8 मे पर्यंत मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम…!

शानु वालावलकर | मालवण:
मालवण तालुक्यातील घुमडे येथील घुमडाई मंदिराच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. ८ मे रोजी श्री घुमडाई देवीच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

निसर्गसौदर्याने नटलेल्या मालवण घुमडे येथील घुमडाई देवीच्या १५ व्या वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ माजी सरपंच दिलीप बिरमोळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले तर घुमडे ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष बाबू बिरमोळे, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी भाऊ सामंत, पोलीस पाटील प्रशांत बिरमोळे, उमेश बिरमोळे, विष्णू बिरमोळे, नितीन राणे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

रात्रौ स्थानिक कलाकारांचे विविध संस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाले.यात रेकॉर्ड डान्स, एकांकिका, एकपात्री प्रवेश, मिमिक्री असे कार्यक्रम संपन्न झाले. आज ६ मे रोजी रात्री ९ वाजता आचरा देऊळवाडी येथील विठ्ठल रखुमाई दिंडी भजन, ७ मे रोजी रात्री ९ वाजता "महाकाली कलेश्वर लिंग स्थापना" हा दशावतारी नाट्य प्रयोग, ८ मे रोजी वर्धापन दिन सोहळा सकाळी ८ वाजता देवीचे पूजन व विधीवत धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा,दुपारी १२ वाजता पालखी सोहळा,१ वाजत महाप्रसाद, ४ वाजता संगीत भजने, रात्री ९ वाजता "येथे ओशाळला मृत्य" धर्मवीर संभाजी महाराज यांची धगधगती शौर्य गाथा हे नाटक होणार आहे. भाविक भक्तांनी वर्धापन दिन सोहळ्याचा आणि धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्ता सामंत, मुंबई घुमडे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष मोहन राणे यांनी केले आहे.

rapan bottom