शहरातील वाहतूक कोंडी, वीज समस्या व अन्य प्रश्ना बाबत महत्वपूर्ण बैठक
तातडीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश
मालवण | प्रतिनिधी :- सर्वाधिक संख्येने पर्यटकांची उपस्थिती असणाऱ्या उन्हाळी पर्यटन हंगामाचा विचार करता शहरातील वाहतूक कोंडी दुरु करण्यासाठी तसेच कमी दाबाचा वीज पुरवठा वं अन्य वीज समस्यां सोडवण्यासाठी नगराध्यक्षा सौं. ममता मोहन वराडकर यांनी सर्व प्रशासकीय विभागाची महत्वाची बैठक मालवण नगरपरिषद येथे बोलावली.
आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सुंदर मालवण शहर ही संकल्पना राबवत असताना अधिकाधिक सोई सुविधा, गतिमान विकास यावर प्राधन्य देण्यात येत आहे. पर्यटन हंगामात शहरातील वाहतूक कोंडी, वीज समस्या व अन्य प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा यांनी दिल्या.

वाहतुक कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस व वाहतूक पोलीस शाखेने खबरदारीचे उपाय करावेत, शहरातील मुख्य नाक्यांवर वाहतुक नियंत्रणासाठी पोलीस तैनात करावेत, अशा सूचना मालवणच्या नगरध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी मालवण नगरपालिकेत आयोजित बैठकीत पोलिसांना केल्या. तसेच वीज वितरण विभागाने शहरातील वीज दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, मालवण शहर, चिवला बीच, दांडी किनारपट्टी याठिकाणी कमी दाबाने वीज पुरवठा व अन्य वीज समस्या आहेत. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर होत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करा. अशा सूचनाही नगराध्यक्षानी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मालवण शहरात वाढत जाणारी वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या आणि वीज दुरुस्ती कामे वं अन्य उपाययोजना याविषयी मालवण नगरपालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी आचरेकर, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कांदळगावकर, रविकिरण तोरसकर, ललित चव्हाण, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नीना मुंबरकर यांच्यासह आरटीओ विभाग अधिकारी, मालवण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, वीज वितरण कंपनी व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, सभापती सहदेव बापर्डेकर, पुनम चव्हाण, निना मुंबरकर, विकी तोरसकर वं अन्य उपस्थित नगरसेवक यांनी चर्चेत सहभाग घेतला. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या संकल्पनेतून आयोजित महत्वपूर्ण बैठकित अनेक जनहिताच्या दृष्टीने महत्वाची चर्चा झाली. शहरातील रस्ता बाजूला वं शासकीय जागेतील अतिक्रमण बाबत नोटीस देऊन पुढील कारवाई होईल असे मुख्याधिकारी यांनी नगरसेवक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना सांगितले.
अमित खोत, मालवण

