प्रतिनिधी | राहुल जाधव, मालवण : - पर्यटन हंगामात कमी दाबाचा वीज पुरवठा व वीज समस्या मुळे मालवण वायरी, तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन व्यावसायिक त्रस्त बनले आहेत. महावितरण कार्यालयात धडक देत वीज समस्या मांडल्या.
कमी दाबाचा वीज पुरवठा, विजेची गैरसोय, भूमिगत विजेच्या तारांचे काम, असे अनेक मुद्दे मांडण्यात आले. सरकार कडून भरीव निधी येऊन सुद्धा त्या पद्धतीचे काम होत नाही असे म्हणणे तारकर्ली पर्यटन संस्था अध्यक्ष (TTDS) सहदेव साळगावकर यांनी मांडले. यावेळी महावितरण ने मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा वायरी - तारकर्ली - देवबाग पर्यटन व्यावसायिकांनी दिला.

या प्रसंगी सहदेव साळगावकर (TTDS अध्यक्ष), भगवान लुडबे (Wairy Bhutanatha सरपंच), रविन्द्र खानविलकर, अभय पाटकर, दर्शन वेंगुर्लेकर, देवानंद लोकेगावकर, मुन्ना झाड, मिलिंद झाड, राहुल कोयंडे, मंदार गोवेकर, गणेश माडये, शिवा माडये, हर्षल गंभीरराव, मनोज खोबरेकर, प्रफुल्ल मांजरेकर, गणेश सातारड़ेकर, दादू डिचवलकर, हर्षद हळदणकर, दाजी जोशी, महेश हुरणेकर, लीलाधर झाड, आनंद हडकर, मिलिंद झाड, मोहित झाड वं अन्य व्यावसायिक उपस्थित होते.

