वाणिज्य शाखेतील कस्तुरी नितीन परुळेकर प्रथम
मालवण | प्रतिनिधी : न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 93.87 टक्के लागला आहे.यात वाणिज्य शाखेचा 94.66 टक्के तर कला शाखेचा 91.30 टक्के निकाल लागला. यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयातून 75 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 71 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय वाणिज्य शाखेत प्रथम कु.कस्तुरी नितीन परुळेकर 81.67 टक्के ( 490 ),द्वितीय कु.आकांक्षा मंदार घाडी, 81.33 टक्के,(488),तृतीय कु.प्रतीक सुनील परब 81.00 टक्के, (481) गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

न्यू इंग्लिश स्कुल आचरा कनिष्ठ महाविद्यालय कला शाखेतून 23 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 21 उत्तीर्ण झाले. या शाखेतील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रथम कु.राजश्री धनाजी बारंगळे, 81.17 टक्के ( 487), द्वितीय पूर्वा विश्वास परब 78.67 टक्के ( 472), तृतीय प्रथमेश राजेंद्र पुजारे 78.33 टक्के (465)गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब, स्थानिक स्कुल कमिटी अध्यक्ष फर्नाडिस, सर्व स्थानिक स्कुल कमिटी सदस्य मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे, उप मुख्याध्यापिका मधुरा माणगांवकर यांनी अभिनंदन केले आहे.

