Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सिंधुदुर्ग नगरीत नव्या रूपात साकारले आकर्षक सर्कल;

सिंधुदुर्ग नगरीत नव्या रूपात साकारले आकर्षक सर्कल;

रोटरी क्लबच्या पुढाकारातून शहर सौंदर्यात भर

सिंधुदुर्ग नगरी :
पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या पुढाकारातून सुशोभित करण्यात आलेल्या सर्कलचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.



सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील चौक (सर्कल) काही काळापासून नादुरुस्त अवस्थेत होता. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांनी पुढाकार घेत, संबंधित प्राधिकरणाची लेखी परवानगी मिळवून सर्कलचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार क्लबच्या सदस्यांनी स्वखर्चाने आणि स्वयंप्रेरणेने सर्कलचे आकर्षक रूपांतरण केले.



या कार्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या काही सदस्यांनीही मोलाचे योगदान दिले. उद्घाटन प्रसंगी प्रभाकर सावंत, डॉ. प्रशांत कोलते, अरूण मालणकर, दीपक आळवे, प्रथमेश सावंत, ललित वंजारे, ऋषिकेश रेडकर, उदयकुमार जांभवडेकर, नवीन बांदेकर, सत्यवान चव्हाण, सागर कुशे, अमेय बर्डे, डॉ. श्रद्धा मालवणकर, अभिजित जैतापकर, विवेक राणे, व्यंकटेश घोगळे आणि सिद्धांत सावंत आदी रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रलचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom