स्थानिक नागरिक व यूथ बिट्स फॉर क्लायमेट सदस्य यांचे मदतकार्य
प्रतिनिधी | राहुल जाधव : शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्याने आडवण मधील संतोष जाधव यांच्या घरासमोर एक रेडा सायकलच्या सांगड्यामध्ये मान अडकून भर दुपारी पडला होता.


आडवण मधील स्थानिक तिथे जमा झाले. सगळ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. यूथ बिट्स फॉर क्लायमेट अध्यक्षा मेगल डिसोझा यांनी रेस्क्यु साठी मदत मागवली व तिथे नगरपालिकेचे सुमेध जाधव व सागर जाधव त्या रेड्याच्या सुटके साठी पोहोचले व सुरक्षित रित्या त्या जीवाची सुटका झाली.


या प्रसंगी स्वप्नील जाधव, साक्षी जाधव, प्रीती फर्नांडिस, धीरज कदम, प्रज्ञा कासले, केतन कासले, यूथ बिट्स फॉर क्लायमेट सदस्य राहुल जाधव, नगरपालिका कर्मचारी सुमेध जाधव आणि सागर जाधव उपस्थित होते.

