Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

ग्रामसेवक ते गटविकास अधिकारी आदर्शवत प्रशासकीय वाटचाल!

ग्रामसेवक ते गटविकास अधिकारी आदर्शवत प्रशासकीय वाटचाल!

मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. श्याम चव्हाण सेवानिवृत्ती विशेष…

🖋️ मालवण पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी (वर्ग 1) श्री. श्याम राजाराम चव्हाण हे कार्यक्षम व लोकहितैषी सेवे नंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. ग्रामसेवक ते गटविकास अधिकारी हा त्यांचा प्रशासकीय प्रवास निश्चितच आदर्शवत व प्रेरणादायी असाच आहे.

मालवण तालुक्यातील नांदोस गावचे सुपुत्र श्री. श्याम राजाराम चव्हाण हे 1987 साली देवगड तालुक्यात खुडी येथे ग्रामसेवक म्हणून रुजू झाले. खुडी तोरसोळे, वळीवंडे, चांदोशी, आरे, ओंबळ, हडपीड, साळशी, कुवळे, आरे, चाफेड, कणकवली साकेडी येथे त्यांनी ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली.
1993 मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. जानेवारी 1993 मध्ये देवगड शहर ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून रुजू झाले. देवगड-जामसडे, तिर्लोट, ठाकूरवाडी, मोड, मळेगाव, शिरगांव, मोडपार आणि मालवण देवबाग येथे त्यांनी सेवा बजावली.

2001 मध्ये श्याम चव्हाण यांना विस्तार अधिकारी पदोन्नती मिळाली. ऑगस्ट 2001 प्रथम समाज कल्याण जि. प. विभाग, ग्रामपंचायत विभाग जि प सिंधुदुर्ग यां ठिकाणी सेवा बाजावून 2004 मध्ये मालवण पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून ते हजर झाले. 2004 ते 2016 पंचायत समिती मालवण येथे विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी सेवा दिली. पंचायत समिती अंतर्गत विस्तार अधिकारी सांखिकी, IRDP, कृषी, कृषी अधिकारी या पदांचा अतिरिक्त कार्यभार घेऊन त्यांनी यशस्वीपणे काम केले.

2016 ते 2019 जानेवारी पर्यंत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विस्तार अधिकरी, 2019 फेब्रुवारी मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी मालवण, 2019 ते 2023 मालवण पंचायत समिती येथे मालवण सहाय्यक बीडीओ म्हणूनही त्यांनी अतिशय आदर्शवत असे सेवाकार्य केले.
या दरम्यान, 2020-2021, 2021-2022 व 2022-2023 या कालावधीत समाज कल्याण अधिकारी प्रभारी कार्यभार त्यांनी यशस्वी पुर्ण केला. 2024 मध्ये कुडाळ येथे बदली झाल्या नंतर सहाय्यक गटविकास अधिकारी कुडाळ व कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. या कालावधीत यशवंत पंचायत राज अभियान, कुडाळ ला विभागात प्रथम क्रमांक मिळवला.

मालवण गटाविकास अधिकारी

श्री. श्याम चव्हाण 30 एप्रिल 2025 रोजी मालवण येथे गटविकास अधिकारी (वर्ग 1) म्हणून रुजू झाले. एक वर्ष कर्तव्यदक्ष वं सेवाभावी वृत्तीने त्यांनी काम केले. आज 30 एप्रिल 2026 रोजी ते नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आहेत.

विविध पुरस्कार व सन्मान

1994 मध्ये ग्राम अभियान सुरू झाले होते त्यावेळी ग्रामपंचत ठाकूर वाडी देवगड, जिल्ह्यात प्रथम क्रमांक पुरस्कार तसेच विभागात दुसरा क्रमांक मिळवला. महाराष्ट्र शासना कडून सन्मान झाला. कुटूंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ठ काम केले, बद्दल 1989 ते1990, 1991 ते 1992, 1993 ते 1994 मध्ये जिल्हा परिषद व शासना कडून पुरस्कार सन्मान. बायोग्यास मध्ये उत्कृष्ट काम केल्या बद्दल पुरस्कार, 1998 ते 1999 मध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला. खरीप हंगाम शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून कृषी खालील क्षेत्र वाढविले, 1996 ते 97 मध्ये जिल्हा परिषद कडून विशेष सत्कार मिळाला. आदर्श ग्राम विकास अधिकरी पुरस्कार, जिल्हा परिषद 2000 ते 2001यां कालावधीत प्राप्त झाला. यशवंत पंचायत राज अभियान 2023-24 विभागात प्रथम. क्रमांक बहुमान प्राप्त केला. यशवंत पंचायत राज अभियानात (2025) मालवण पंचायत समिती जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला.

2020-21 ते 2021-22
समाज कल्याण अधिकरी असताना सर्व योजनेचा 100 टक्के निधी खर्च करून दिव्यांग साठी विशेष प्रयत्न करून udid कॅम्प जिल्ह्याभरात घेतले. आदर्शवत असा हा उपक्रम राहिला. त्यासाठी शासना कडून विशेष सत्कार करून श्याम चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. मालवण तालुक्यातील 29 भुमिहीन वं बेघर कातकरी कुटुंबाना आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून जागा व घरे मिळाली. यां सर्व प्रक्रियेत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचेही महत्वपूर्ण योगदान राहिले.

वडील व कुटुंबियांची मोलाची साथ

प्रशासकीय सेवा काळात देश सेवेसाठी सैन्यात असलेले वडील व कुटुंबियांची मोलाची साथ लाभली. विशेष म्हणजे सवेच्या सुरवातीच्या काळात वडिलांचे खूप मोठे योगदान लाभले आणि घडत गेलो. त्यांचा आदर्श घेऊन घडत गेलो. जनतेची सेवा करत राहिलो. यां सोबत माझ्या नांदोस गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ वं सर्व नागरिकांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले. अश्या भावना गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी यां निमित्ताने व्यक्त केल्या.

सचिव : ग्रामसभा ते आमसभा

ग्रामसेवक म्हणून सेवाकाळ सुरु झाल्या नंतर ग्रामपंचायत वं ग्रामसभा सचिव म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. पंचायत समिती सचिव, समाजकल्याण समिती सचिव म्हणून काम पाहत असताना सेवानिवृत्ती दरम्यान आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मालवण पंचायत समिती आमसभेत सचिव म्हणून काम पाहणारे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा प्रवास ग्रामसभा ते आमसभा सचिव असा गौरवास्पद राहिला.

आमदार निलेश राणे यांनी केले खास कौतुक

गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या कार्यक्षम व लोकहितैषी सेवा कार्याचे खास कौतुक आमदार निलेश राणे यांनी आमसभेच्या निमित्ताने केले. गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या अनुभवाचा फायदा फायदा निश्चितच पुढील काळतही मालवण तालुक्याला होईल. असे गौरवोद्गार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.

▪️स्काय न्युज टुडे

rapan bottom