Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

वाळू उपशावर कारवाई व्हावी

वाळू उपशावर कारवाई व्हावी

रेवंडी ग्रामस्थांची मागणी

मालवण | प्रतिनिधी : तोंडवळी ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये वाळू उपसा विरोधात ठराव घेतलेला असतानाही प्रत्यक्षात तोंडवळी गावातील लोकप्रतिनिधींच्या संमतीने व सहभागाने तोंडवळी तळाशील गावातील खाडी पात्रामध्ये सध्या पंचवीस ते तीस बोटिंद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरु आहे, असा आरोप रेवंडी ग्रामस्थानी करत या वाळू उपशावर कारवाई करावी अशी मागणी मालवण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रेवंडी येथील ग्रामस्थानी आज मालवण तहसील कार्यालयात नायब तहसीलदार जांभेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी रेवंडीचे सरपंच अमोल वस्त, ग्रा. पं. सदस्या मेघना कांबळी, युवराज कांबळी, दिलीप मोर्वेकर, सचिन मोर्वेकर, विजय कांबळी, प्रसन्न कांबळी, भावेश कांबळी, संतोष मुणगेकर, प्रसाद कांबळी, मिलिंद कांबळी, विनायक कांबळी, प्रितेश मयेकर, शामराव कांबळी, अनिरुद्ध पोयरेकर आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

कालावल खाडीतील वाळू उपसा थांबविण्यासाठी तळाशील ग्रामस्थ ज्या ठिकाणी उपोषणास बसले होते त्या तळाशील येथील श्रीकृष्ण मंदिरा नजीकच्या ठिकाणाजवळ शासनाचा बंधारा फोडून तेथे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन चालू आहे. त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामस्थांनी केली. तोंडवळी ग्रामपंचायत मार्फत वाळू उपसा बंदीचा ठराव चुकीच्या पद्धतीने मंजूर झाला असून शासनाची फसवणूक करून शासनाला फक्त दिखावा करून दाखवण्यासाठी हा ठराव घेतलेला आहे, असा आरोप रेवंडी ग्रामस्थांनी केला.

तळाशील येथील वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी तात्काळ पंचनामा करून बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींची वाळू उपसा कायम थांबवण्यात यावी. वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींची वापरात असलेली बोट / यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी. शासकीय बंधारा वाळू उपसा करण्यासाठी तोडलेला असून, त्यामुळे होणारी नुकसानी संबंधितांकडून वसूल करावी व संबंधीत कारवाई करावी. कांदळवन तोडलेले असल्यामुळे CRZ अधिसूचना २०१९ नुसार कांदळवन क्षेत्र हे CRZ 1-IA नुसार सर्वात संवेदनशील असल्याने त्यांच्यावर पर्यावरण सर्वेक्षण कायदा १९८६ व इतर तरतुदी नुसार संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या यावेळी रेवंडी ग्रामस्थांनी केल्या.

rapan bottom