Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

युवा वर्गाच्या उत्स्फूर्त प्रतिसादात 'युवाशक्ती जागर यात्रा'

युवा वर्गाच्या उत्स्फूर्त प्रतिसादात 'युवाशक्ती जागर यात्रा'

युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा मालवण दौरा ; पदाधिकारी, युवक व कॉन्टेन्ट क्रिएटर्ससोबत संवाद

मालवण | प्रतिनिधी : भाजप युवामोर्चाच्या 'युवाशक्ती जागर यात्रेचा' कोकण प्रांतातील दौरा यशस्वीरित्या पार पडला आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत संघटना मजबुती यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या जागर यात्रेतून युवकांना भावणाऱ्या विविध विषयांमध्ये काम करण्याचा प्रयत्न होणार आहे. अतिशय सुंदर कोकण दौऱ्याचा अनुभव मी आयुष्यभर विसरणार नाही, अशा भावना भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केल्या.

भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष तथा लोकप्रिय सोशल मीडिया इंफ्लूएन्सर व आंतरराष्ट्रीय कार रेसर कृष्णराज धनंजय महाडिक हे युवा शक्ती जागर यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी मालवणला भेट दिली. या भेटीत महाडिक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देऊन श्री शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. तसेच किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास भेट देऊन शिवरायांच्या चरणी ते नतमस्तक झाले.

मालवण दौऱ्यात कृष्णराज महाडिक यांचे भाजपा मालवण कार्यालय येथे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उपाध्यक्ष राकेश सावंत, मालवण शहराध्यक्ष तथा नगरसेवक ललित चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना श्री. महाडिक म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवाशक्ती जागर यात्रेची सुरुवात झाली. या कोकण प्रांतात फिरत असताना सर्व नेते मंडळींची भेट घेतली तसेच प्रामुख्याने सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटलो. या माध्यामातून एक संघटन बांधणी आम्हाला करायची आहे. युवा मोर्चाची टीम संघटना वाढीसाठी ताकदीने काम करत असल्याचे निदर्शनास आले. या यात्रेमध्ये फक्त राजकीय विषयच नाहीत तर युवकांना भावणाऱ्या प्रत्येक विषयामध्ये काम करण्याचे आम्ही ठरविले आहे. याच दृष्टीकोनातून सिंधुदुर्ग किल्ला तसेच राजकोट किल्ला याठिकाणी भेट दिली आहे. तसेच रॉक गार्डन येथे काँटेंट क्रिएटर सोबत चर्चा केली, कारण त्यांचे देखील काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

कॉन्टेन्ट क्रिएटर्ससोबत महाडिक यांचा संवाद

कृष्णराज महाडिक यांनी रॉक गार्डन येथे कॉफी विथ इंफ्लूएन्सर्स या कार्यक्रमाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लूएन्सर्स सोबत संवाद साधला. यावेळी युट्युबर्स, रिलस्टार, कंटेन्ट क्रिएटर यांनी महाडिक यांच्यासमोर मनोगते व्यक्त करत समस्याही मांडल्या. यावेळी कृष्णराज महाडिक म्हणाले, राजकारणात मी आता सक्रीय झालो असलो तरी या अगोदर खेळामध्ये तसेच काँटेट क्रिएटर म्हणून काम केले आहे. युवा शक्ती जागर यात्रा दौऱ्यामुळे महाराष्ट्रात फिरत असताना काँटेंट क्रिएटर्स सोबत कनेक्ट व्हायला मिळत आहे. तसेच कॉटंट क्रिएटरसाठी काहीतरी केले पाहिजे या हेतूने आज आपण एकत्र आलो आहोत. काँटेंट क्रिएशन भविष्यात कितपत वाढू शकतो याचा विचारसुद्धा आजच्या घडीला आपण करू शकत नाही. कॉन्टेन्ट क्रिएटर्स माझ्याकडे त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडू शकतात. कॉन्टेन्ट क्रिएटर्स व शासन यांच्यामधील मी एक दुवा बनू शकतो व येणाऱ्या काळात कॉंटेंट क्रिएटरसाठी शासनापर्यंत पोहोचून त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकतो. क्रिएटर्सनी आपली भाषा, संस्कृती, सण, उत्सव यांचा अभिमान बाळगत त्यांचे प्रदर्शन आपल्या व्हिडीओतून करत त्यांना पुढे नेण्याचे काम केले पाहिजे. त्यातून निश्चीतपणे आपल्याला खूप सारे यश मिळू शकते. ज्याप्रमाणे पर्यटन वाढत आहे त्याचप्रमाणे आपण सतर्क राहणे ही फार गरजेचे आहे. छुपी प्रेक्षणीय स्थळे समोर आणताना त्यांच्या संवर्धनासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

यावेळी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, स्वप्नील काळे पाटील, भाजप जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेविका दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक ललित चव्हाण, मंदार केणी, रविकिरण तोरसकर पं. स. सदस्य दीपक सुर्वे, भाई कासवकर, सेजल परब, तारका चव्हाण, अमृता फाटक, भाई कासवकर, आबा हडकर, मनोज मेथर, पंकज सादये, लकी कांबळी, रोहन सावंत, सुमित सावंत, सुशील गावंडे, पंकज पेडणेकर, फ्रासीस फर्नांडिस, कुणाल खानोलकर व इतर उपस्थित होते.

अनेक युवक युवती कृष्णराज महाडिक यांच्या भेटीला

युवक युवती तरुण वर्गात कृष्णराज महाडिक यांची मोठी क्रेज दिसून आली. अनेक युवक युवती कृष्णराज महाडिक यांच्या खास भेटीला आले होते. सर्वांनी त्यांच्या सोबत फोटो काढले.

पालकमंत्री नितेश राणे यांचे कार्य आदर्शवत

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ना. नितेश राणे हे युवकांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. त्यांचे विकासाचे मोठे व्हिजन असून काम करण्याची पद्धत सुंदर व आदर्शवत आहे, असे गौरवोदगार कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केले.

rapan bottom