Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

आगीत दुचाकी जळून खाक

आगीत दुचाकी जळून खाक

मालवण देऊळवाडा येथील घटना

मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला अथक परिश्रमांनतर आग आटोक्यात आली मात्र, दुचाकी जळाल्याने मोठे नुकसान झाले, सुदैवाने दुचाकी चालकास कोणतीही दुखापत झाली नाही.

मालवण देऊळवाडा रस्त्यावरून दुपारी एक दुचाकी चालक त्याच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची विगो दुचाकी घेऊन जात असताना दुचाकीच्या मागील बाजूस अचानक आग लागली. ही आग मागील बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात येताच त्याने त्वरित दुचाकी चालकास सांगितल्याने त्याने दुचाकी थांबवली. ही आग वाढतच जाऊन दुचाकीचा मागील भाग व सीटचा भाग अगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी माती, पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भडकलेली आग विझेपर्यंत दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. ही आग दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या पेट्रोलच्या टाकीला लागल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला जात आहे.

rapan bottom