Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे

जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, करण्यात आलेल्या पंचनाम्यांनुसार अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत सावंतवाडी तहसीलदारांनी सविस्तर अहवाल सादर केला असून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शासकीय निकषांनुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागामध्ये ६१ घरांचे नुकसान झालेले आहे. त्याचे देखील त्वरित पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या हानीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात जिल्हा पातळीवरील आढावा बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः धोकादायक झाडांची छाटणी तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व उपाययोजना गतीने राबविण्यात येत आहेत. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन प्रशासनाने सज्ज राहावे, यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

rapan bottom