सिंधुदुर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे सर यांचा प्राध्यापक पदाचा 2 वर्षांचा परिविक्षा कालावधी समाप्त झाला, त्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी यांनी डॉ. अनंत दवंगे यांचे अभिनंदन करत सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. अनंत दवंगे सर हे जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदूर्ग येथे अधिष्ठाता पदाचा पदभार सांभाळत असून, या कालावधीत बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी यांच्या कामगिरीवर आणि कार्येक्षमतेवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच अधिष्ठाता डॉ. दवंगे सर यांनी यापुढे देखील अधिष्ठाता पदाची धुरा अश्याच रीतीने सांभाळावी, अशी अपेक्षा आणि विश्वास सर्व कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदूर्गच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी मा. अधिष्ठाता डॉ. दवंगे सर यांच्या सोबत यापुढेही सक्षमपणे कार्यरत राहतील, अशी ग्वाही देखील कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात आली. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा शुभेच्छारूपी विश्वास आणि अभिनंदन याचा स्वीकार डॉ. अनंत दवंगे यांनी मनापासून करतं त्यांचे आभार मानले.

