Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

'ग्रीन सी टर्टल' कासावाची जाळ्यातून सुटका…!

'ग्रीन सी टर्टल' कासावाची जाळ्यातून सुटका…!

मालवण राजकोट समुद्रात पारंपरिक मच्छिमार सन्मेष परब यांनी केली सुटका

मालवण | प्रतिनिधी : मालवण राजकोट येथील समुद्रात मासेमारी जाळ्यात अडकलेल्या 'ग्रीन सी टर्टल' या समुद्री कासावाची पारंपरिक मच्छिमार सन्मेष परब यांनी सुटका केली.

मालवण राजकोट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील समुद्रात पारंपरिक मच्छिमार सन्मेष परब हे मासेमारीला गेले असता त्यांच्या जाळ्यात अनावधानाने एक समुद्री कासव हे अडकलेल्या अवस्थेत आहे असे निदर्शनास आले. त्यानंतर सन्मेष परब यांनी आपले मासेमारीचे जाळे फाडून त्या ग्रीन सी टर्टल' या कासवाची जाळ्यामधून सुटका केली.

'ग्रीन सी टर्टल' हे जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय सागरी क्षेत्रात २० अंश सेल्सियस तापमान असणाऱ्या पाण्यात आढळून येते. 'ग्रीन सी टर्टल' हे सर्वात मोठे कठीण कवचाचे समुद्री कासव आहे. समुद्री कासवांमध्ये ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत कारण ते प्रामुख्याने शाकाहारी असून, बहुतेक समुद्री गवत आणि शेवाळ खातात. तथापि, उपलब्ध असल्यास ते स्पंज, इतर अपृष्ठवंशीय प्राणी आणि टाकून दिलेले मासे देखील खाऊ शकतात तसे त्यांच्या परिस्थिती वर अवलंबून आहे की ते प्रौढ आहेत की नवजात त्यावर त्यांचा आहार ठरतो. नवजात लहान जीव सर्वभक्षी असतात व प्रौढ कासवे प्रामुख्याने शाकाहारी असतात.

'ग्रीन सी टर्टल' हे नाव त्यांच्या चरबीच्या रंगावरून आले आहे (कवचावरून नाही), ज्याचे श्रेय मूळतः त्यांच्या आहाराला दिले जात होते; तथापि, इतर समुद्री कासवांमध्येही हिरवट रंगाची चरबी आढळते. यांचे कवच लंबगोलाकार आणि शेपटीकडे टोक असलेले असते. या कासवांची चोच तीक्ष्ण आणि बारीक दाते असलेली असते. भारतातील कठीण कवचधारी सागरी कासवांमधील आकाराने सर्वात मोठे असणारे हे कासव आहे. त्यांची लांबी सुमारे ३ ते ४ फूट पर्यंत वाढू शकते. पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ 'ग्रीन सी' कासवांचे वजन १३६ ते १६० किलो दरम्यान असते. मालवण राजकोट समोरील समुद्रात श्री.सन्मेष परब यांना आढळलेल्या 'ग्रीन सी टर्टल' कासवाची जाळ्यामधून सुटका करते वेळी महादेव केळुसकर आणि सुयोग परब हे पारंपरिक मच्छिमार उपस्थित होते.

rapan bottom