Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

कुंभारमाठ ग्रामपंचायतचा पर्यावरणपूरक उपक्रम

कुंभारमाठ ग्रामपंचायतचा पर्यावरणपूरक उपक्रम

प्लास्टिक मुक्तीचा संदेश : कापडी पिशवी केंद्र (मशीन) उभारणी : ग्रामस्थांना माफत दरात कापडी पिशव्या उपलब्ध :

मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत ग्रामस्थांना माफत दरात कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या कार्यकारीणीने अभ्यास दौऱ्यावेळी ग्रामपंचायत कार्यालय भोसे ता. मिरज जि. सांगली येथे भेट दिली असता कापडी पिशवी मशीनचा एक नाविन्यपुर्ण उपक्रम निदर्शनास आला. त्या अनुषंगाने कापडी पिशवी केंद्र (मशीन) कुंभारमाठ येथील रेशनिंग दुकानाजवळ बसविण्यात आले असून, नागरिकांना सहज आणि कमी खर्चात कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मशीनचा शुभारंभ मंगळवार २१ एप्रिल रोजी करण्यात आला.

यावेळी सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, पंचायत समिती सदस्य सौ. मानसी भोगावकर, पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर साहेब, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर व अनिता गावकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामस्थांना माफक दरात कापडी पिशवी उपलब्ध होणार आहे. प्लास्टिकचा वापर कमी होईल. पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित राहील. भविष्यातील पिढीसाठी चांगले वातावरण निर्माण होईल. तरी सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा आणि या उपक्रमाला सहकार्य करावे. या उपक्रमाला चांगल्याप्रकारे प्रतिसाद लाभल्यास इतर ठिकाणी हि अशा मशीन बसविण्याचा ग्रामपंचायतचा मानस आहे. “माझी वसुंधरा" प्लास्टिक मुक्त गाव – आपली सामूहिक जबाबदारी” असे कुंभारमाठ ग्रामपंचायत यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom