शेलटी ग्रामस्थ मंडळाचा प्रशासनास इशारा
मालवण | प्रतिनिधी : खड्डेमय तसेच वाहतूकिस धोकादायक बनलेल्या मालवण-आचरा मार्गावरील हडी-शेलटीवाडी येथील वाकडा आंबा ते शेलटी रस्ता दुरुस्त न झाल्यास 1 मे 2026 रोजी लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशार शेलटी ग्रामस्थ महिलाच्या वतीने मालवण तहसीलदार यांना देण्यात आला.
शेलटी ग्रामस्थ मंडळयांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण-आचरा मार्गावरील हडी-शेलटीवाडी येथील वाकडा आंबा ते शेलटी रस्त्या संबंधी गेली अनेक वर्षे बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांच्या पर्यंत रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व्हावे असे निवेदन दिले आहे परंतु आम्ही शेलटी ग्रामस्थ, मुंबई स्थित ग्रामस्थाच्या निवेदनांना प्रशासन केराची टोपली दाखवीत आहे.
येत्या ८ दिवसांत या रस्त्याबाबत कार्यवाही न झाल्यास १ मे रोजी आम्ही शेलटी वाडीतील ग्रामस्थ पुरुष महिला आचरा-मालवण मार्गावरील शेलटी फाटा येथे लाक्षणिक उपोषणास छेडणार आहोत. असा इशारा शेलटी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने महसूल व पोलीस प्रशासनास देण्यात आला आहे.

