Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

प्रज्ञा परीक्षेची वेळ सकाळी

प्रज्ञा परीक्षेची वेळ सकाळी

शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्याकडून शिक्षक समितीची मागणी मान्य

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेची नियोजित दिवसभराची वेळ विद्यार्थ्याना उन्हाळ्याच्या दिवसात त्रासदायक असल्याने ती सकाळ सत्रात करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग यांनी शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी सदर परीक्षेची वेळ सकाळ सत्रात करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले.

सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढलेली आहे. सकाळी ११ ते ३ अशी भर उन्हाची वेळ ही परीक्षेसाठी योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. याबाबत शिक्षक समिती सिंधुदुर्ग ने शिक्षण सभापती यांच्याशी चर्चा करून सकाळी नऊ ते साडेदहा आणि अकरा ते साडेबारा असे दोन पेपर घेण्यात यावे असे निश्चित करण्यात आले. या चर्चेमध्ये राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, पतपेढी संचालक नारायण नाईक, राज्य पदाधिकारी राजू वजराटकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जावेद तांबोळी तसेच शिक्षक समिती पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती देण्यात आली आहे.

rapan bottom