मालवण | प्रतिनिधी : मालवण खैदा येथील श्रीमती आशा धोंडी कांबळी (वय ७५) यांचे रविवारी खैदा येथील राहत्या घरी निधन झाले.
आशा कांबळी या कष्टाळू, मनमिळावू, परोपकारी वृत्तीच्या होत्या. त्याच्या पश्चात एक मुलगी, तीन मुलगे, सुना, नातू, नात, असा मोठा परिवार आहे. खैदा येथील सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळी, तसेच कोळंब ग्रामपंचायत माजी सदस्य संजय कांबळी, कोळंब ग्रा.प. माजी सरपंच मनोहर कांबळी यांच्या त्या आई होत.
रविवारी सायंकाळी उशिरा खैदा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने परिवार, ग्रामस्थ उपस्थित होते.

