अमूल आईस्क्रीम पार्लरचे मालवणात उत्साहात उद्घाटन
अमित खोत | मालवण : मालवण शहरात ‘स्कूप दे मालवण’ या नव्या अमूल आईस्क्रीम पार्लरचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मालवण बस स्थानक समोरील शॉपमध्ये सुरू करण्यात आलेल्या या पार्लरचे उद्घाटन उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या पार्लरच्या माध्यमातून मालती (आकांक्षा) दत्ताराम पाटकर यांनी या व्यवसाय क्षेत्रात नवे पाऊल टाकले असून, स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांसाठी दर्जेदार व विविध प्रकारचे अमूल आईस्क्रीम एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना दीपक पाटकर यांनी मालती पाटकर कुटुंबियांच्या या उपक्रमाचे कौतुक करत, त्यांच्या व्यवसायाला भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच स्थानिक तरुण, तरुणीनी उद्योजकतेकडे वळावे, असा आशावादही व्यक्त केला.

या कार्यक्रमास दत्ताराम मनोहर पाटकर, दर्शना पाटकर, अनिकेत पाटकर, प्राजक्ता पाटकर, निलेश परुळेकर, सुदेश आचरेकर यांच्यासह कुटुंबिय व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मालती पाटकर व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देत नव्या व्यवसायासाठी उत्साह
फोटो : गणेश गांवकर, मालवण

