Wednesday, 28 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

रामगड सरपंच शुभम मटकर यांची वारेली चिपळूण येथील झरे पुनर्जीवन प्रकल्पास भेट

रामगड सरपंच शुभम मटकर यांची वारेली चिपळूण येथील झरे पुनर्जीवन प्रकल्पास भेट

लवकरच रामगड गावामध्ये प्रकल्प राबविणार

मालवण : रोटरी क्लब ऑफ बॉम्बे व दिगंत स्वराज फाऊंडेशन मार्फत वारेली चिपळूण येथील झऱ्यांचे पुनर्जीवन करून गुरुत्वाकर्षणामार्फत ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या प्रकल्पाला भेट देत रामगड सरपंच शुभम मटकर यांनी शुभेच्छा दिल्या.

कोकणातील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून व पावसाळी व उन्हाळी ऋतूमधील झऱ्याच्या प्रवाहाचा अभ्यास करून झऱ्याच्या प्रवाहाचा मार्ग जास्त खंडित न करता त्या द्वारे डोंगर उतारावर ५ साठवण टाकी मध्ये पाणी जमा करून तब्बल ४ किमी पाइपलाइन चा वापर करून ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासोबतच शेती साठी पाणी पुरवठा करणारा हा प्रकल्प आहे.

सदर योजनेबद्दल सरपंच मटकर यांनी कौतुक करत सदर प्रकल्पाचे सादरीकरण आपण सिंधुदुर्गाचे पालकमंत्री मा. नितेश राणे व आमदार मा. निलेश राणे यांना सादर करणार आहोत. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून व दिगंत स्वराज चे राहुल तिवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून लवकरच हा प्रकल्प रामगड गावामध्ये राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सोबत या प्रकल्पासाठी पाठपुरावा करून वारेली गावाप्रमाणेच रामगड गावातील ग्रामस्थांना फायदा व्हावा ही इच्छा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी चिपळूण पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, रोटरी क्लब चिपळूण व रत्नागिरी चे सभासद,दिगंत स्वराज चे संचालक राहुल तिवरेकर, किशोर तेली, रामगड सरपंच शुभम मटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

rapan bottom