Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मत्स्यालय निधी परत जाण्याची नामुष्की माजी आमदार वैभव नाईक यांच्याचमुळे!

मत्स्यालय निधी परत जाण्याची नामुष्की माजी आमदार वैभव नाईक यांच्याचमुळे!

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी माजी आमदार नाईक यांना सुनावले

मालवण | प्रतिनिधी : आपल्या आमदार कार्यकाळात वैभव नाईक यांनी प्रशासकावर अंकुश ठेवला असता तर मत्स्यालय निधी परत पाठवण्याची नामुष्की आली नसती. असा टोला लगावत मालवण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर यांनी माजी आमदार वैभव नाईक यांना सुनावले आहे.

मालवण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे, मालवण नगर परिषदेत प्राप्त मत्स्यालय निधी परत जाण्यास जबाबदार कोण हा प्रश्न खरतर माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वतःला विचारणे अपेक्षीत होते. म्हणजे त्याच खर उत्तर मिळाले असत. कारण प्रशासनातील दिरंगाई आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्या अभावी हा निधी परत गेल्याच त्यांनी आपल्या मालवण नगर परिषद भेटी च्या दरम्यान मत व्यक्त केले आणि सध्याचे मुख्याधिकारी यांच्या वर नाराजी व्यक्त केली. वास्तविक पाहता प्रशासनातील दिरंगाई ही आमचा कालावधी २०२१ ला संपल्या नंतर प्रशासकीय कालावधी सुरू झाल्यावर सुरू झाली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार वैभव नाईक २०२१ ते २०२४ कालावधी पर्यंत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्याच कालावधीत प्रशासन दिरंगाई करत होते.

त्यावेळी वेळोवेळी तत्कालीन प्रशासक संतोष जिरगे हे मनमानी कारभार करत असल्या बाबत आम्ही त्यांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष म्हणून सातत्याने भुमिका मांडली. सोशल मीडिया, पेपर या माध्यमातूनही भूमिका व्यक्त केली. त्यावेळी तत्कालीन आमदार वैभव नाईक यांनी प्रशासकावर अंकुश ठेवला असता तर कदाचित मत्स्यालय निधी परत पाठवण्याची नामुष्की आली नसती. कुठल्याही निधीला एक कालावधी असतो आणि त्या कालावधीत काम झाले नाही तर शासनाला तो परत करायला लागतो हा नियम आहे. मत्स्यालयाच्या जागेकडे जाण्याच्या मार्ग बाबतचा भूसंपादनाचा विषय होता तो आमच्या कालावधीत सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. जागा मालकांबरोबर अनेक बैठका पण झाल्या होत्या पण आमचा कालावधी संपल्या नंतर प्रशासकीय कालावधीत याबाबत कुठलेही प्रयत्न न झाल्यामुळेच हा निधी परत पाठवावा लागला आहे ही वस्तुतिथी आहे.

भाजी मार्केट/ सफाई कामगार इमारत

मत्स्यालय हा एकच विषय नाही तर भाजी मार्केट इमारतिचे काम जे आमच्या कालावधीत सुरू झाले होते ते सीआरझेड परवानगी मुळे अडले होते. हा विषय प्रशासकीय तीन चार वर्षाच्या कालावधीत सोडवला गेला नाही त्यामुळे ही इमारत अपूर्ण आहे. आमदार निलेश राणे साहेबांनी निवडून आल्या नंतर आपल्या पहिल्या आढावा बैठकीत हा विषय घेतल्याने आता हा विषय परवानगी स्तरावर आहे. त्याच प्रमाणे मालवण नगर परिषद सफाई कामगार इमारती साठी आम्ही केलेल्या ठरावा मधे काही त्रुटी राहिल्याने नव्याने दुरुस्ती करून नवीन ठराव करून देणे बाबत , तसेच काही मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याबाबत शासनाने कळविल्याने ते देणे आवश्यक होते. पण तत्कालीन मुख्याधिकारी जिरगे यांनी याबाबत ना ठराव केला, ना मुदतीत उत्तर दिले ना संबधित विकासकांला काम बंद करण्याबाबत पत्र दिले. याबाबत पण आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो . याबाबतही तत्कालीन आमदार नाईक यांनी योग्य पाठपुरावा केला असता तर आज ही इमारत तयार झाली असती.

बायोटॉयलेट गाड्या/ कचरा मशीन

आमच्या कालावधीत पर्यटक सुविधा म्हणून पाच बायोटॉयलेट गाड्या घेतल्या होत्या. प्रशासकीय काळात त्याचा वापर होत नसल्याबाबत सुचना करूनही त्याबाबत काहीही कार्यवाही न केल्याने या गाड्या नादुरुस्त झाल्या. या नादुरुस्त गाड्याची दुरुस्ती आमचे आमदार निलेशजी राणे यांनी निवडून आल्यावर स्वखर्चाने करून दिली. तसेच कचऱ्यापासून खत निर्मितीच्या मशीन नादुरुस्त असल्याने दुरुस्त करून घेणे बाबत पाठपुरावा करूनही त्या दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. त्या मशीन सुद्धा आमदार निलेशजी राणे यांनी स्वखर्चाने दुरुस्त करून दिल्या होत्या.

नगरपरिषद गाळे लिलाव

मच्छीमार बांधवांच्या दृष्टिने मालवण नगर परिषद मच्छी मार्केट येथे बांधलेल्या गाळ्याचे भाडे ठरवून भाड्याने देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही कुठलीही कार्यवाही केली गेली नाही. गाळ्यांचे लिलाव, नगर परिषद मुदत संपलेल्या भाड्याच्या इमारती कित्येक वर्ष न झाल्याने नगर परिषदेला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आता हे लिलाव का लावले नाही म्हणून सध्याच्या मुख्यअधिकारी यांना प्रश्न विचारता तर त्या वेळच्या प्रशासकाला जाब विचारला असता तर हे नुकसान झाले नसते.

भुयारी गटार योजना

भुयारी गटार योजना आमच्या मुदतीत व्हावी म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न केले. हा ठेकेदार बदलला असता तर नवीन टेंडर प्रक्रिया करणे, यासाठी जादा निधी उपलब्ध करून घेणे, तसेच जुन्या ठेकेदाराला काढून टाकल्यावर त्यांच्या कडून कायदेशीर कारवाईत आपली योजना अडकून राहील याचा विचार करूनच आम्ही त्याच ठेकेदाराकडून काम करून घेण्याबाबत प्रयत्न केले. जर आमची भूमिका चुकीची होती तर तेव्हा अधिकार वाणीने ठेकदार बदलणे बाबत सूचना केली असती तर आम्ही ते पण केले असते. पण याचा दोष तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून आमच्या वर देणे चुकीचे आहे. आमच्या कालावधीत काही प्रमाणात आम्ही भुयारी गटार चे काम करून घेतले आहे पण आमचा कालावधी संपल्या नंतर प्रशासकीय कालवधीत एक टक्का पण काम झाले नाही आणि कोट्यवधीची बिल अदा केली गेली. त्यावेळी या दीर्घ प्रशासकीय कालावधीत हा ठेकेदार बदलण्याची कारवाई का झाली नाही याच पण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमचा कालावधी संपल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांच्या पक्षाचे माजी नगराध्यक्ष म्हणून सातत्याने प्रशासक संतोष जिरगे यांच्या मनमानी कारभाराबाबत दोन अडीज वर्ष भूमिका मांडत होतो पण आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही ना आमच्या सूचनांवर प्रशासक यांच्याकडे पाठपुरावा केला गेला. आता ज्याप्रमाणे मुख्याधिकारी यांना जाब विचारला गेला तसा जाब आमच्या वेळी आम्हाला घेऊन तत्कालीन प्रशासक जिरगे यांना का विचारला गेला नाही याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे पूर्वी आवश्यक पाठपुरावा न केल्यामुळे न झालेल्या कामांचे खापर नूतन मुख्याधिकारी आणि दोन तीन महिन्या पूर्वी बसलेल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या वर फोडणे योग्य नाही. आम्ही नेहमी जाहीर कबुली दिली आहे की जर चांगल्या कामाचे श्रेय माझे आहे तर चुकीच्या कामाची जबाबदारी पण माझीच आहे.

▪️विकासकामाना भरघोस निधी

सद्यस्थितीत आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार नारायणराव राणे साहेब, आमचे आमदार निलेशजी राणे साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या मार्फत कोट्यवधीचा विकास निधी मालवण नगर परिषदेस प्राप्त होत आहे. याचा आकडा जेव्हा वर्षाच्या शेवटी जाहीर होईल तेव्हा तो मालवण वासियांसाठी नक्कीच सुखावह असेल यात शंका नाही. अशी भुमिका मालवण नगरपरिषद माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केली आहे.

rapan bottom