Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे

रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे

नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या भाजीपाला स्टॉल व्यवसायिकांना नोटीसा : रचना सहाय्यक व नगरसेवक यांनी पाहाणी करून तात्काळ कार्यवाही बाबत दिल्या सूचना

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद भाजी मार्केट इमारत समोर भाजीपाला स्टॉल व्यवस्यायिक यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे याबाबत नोटीसा मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, रचना सहाय्यक स्नेहल पाटील यांनी स्टॉल ठिकाणी जावून रस्ता व बंदिस्त गटार यांची हद्द दाखवली. त्यामागे स्टॉल न्यावेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होता नये अश्या सक्त सूचना दिल्या. यावेळी उपस्थित नगरसेवक यांनीही वाहतुकीस अडथळा ठरेल अशा प्रकारे कोणतेही स्टॉल असू नये. अन्यथा नियमानुसार कारवाई होणार असे स्पष्ट केले.

नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले होते, नगरपरिषद हद्दीतील भाजी मार्केट इमारती समोर भाजीपाल्याचे स्टॉल लावले असून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तरी आपले भाजीपाल्याचे स्टॉल तात्काळ रस्त्यावरुन मागे घेवून गटारापासून आतमध्ये लावावेत. अन्यथा आपल्या विरुध्द नियमोचित प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावित करुन स्टॉल उचलण्यात येतील, याची दखल घ्यावी. या नोटीस प्राप्त झाल्या नंतर व्यवसायिकानी आपले भाजीपाला स्टॉल मागे घेण्याची कार्यवाही तात्काळ सुरु केली आहे.

मालवण नगरपरिषद रचना सहाय्यक, स्नेहल पाटील यांनी रस्ता व गटार यांची हद्द दाखवून देत यापुढे कोणतेही अतिक्रमण करण्यात येऊ नये याबाबत सक्त सूचना केल्या. यावेळी उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक ललित चव्हाण, शेखर गाड आदी उपस्थित होते.

फोटो : भाजीपाला स्टॉल मागे घ्यावेत घ्यावेत याबाबत नगरपरिषद अधिकारी व नगरसेवक यांनी पाहणी करून सूचना केली. (अमित खोत, मालवण )

rapan bottom