Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

खड्डेमय व धोकादायक रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावे

खड्डेमय व धोकादायक रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावे

अन्यथा 1 मे रोजी उपोषण छेडणार : शेलटी ग्रामस्थांच्या वतीने इशारा

मालवण | प्रतिनिधी : वाकडा आंबा ते शेलटी (हडी) या गेली अनेक वर्ष खड्डेमय व धोकादायक रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करावे. अन्यथा 1 मे रोजी उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, वाकडा आंबा ते शेलटी (हडी) ग्रामीण मार्ग क्र. 225 हा रस्ता शेलटी वाडी मध्ये जाण्याचा एकमेव मार्ग आहे. हा रस्ता डोंगरातून मोठ्या घोकादायक उताराने शेलटी वाडी मध्ये जातो. गेली 20 वर्षे या रस्त्यावर शासनाचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. आम्ही शेलटी ग्रामस्थ मंडळ, शेलटी आणि शेलटी ग्रामोनती मंडळ मुंबई हा रस्ता दुरुस्त करून मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे अतोनात प्रयत्न करत आहोत. परंतु फक्त आश्वासन मिळतात प्रत्यक्षात निधी काही मिळत नाही. रस्ता एवढा खराब झालेला आहे की सध्या तिथे रस्ताच शिल्लक नाही. वाडीतील महिला लहान मुलांना शाळेतून टू व्हीलर वरून घेऊन येताना बऱ्याच अपघात होत असतात. कुठलाही रिक्षावाला या खड्डेमय रस्त्यामुळे शेलटीला भाड्याला येत नाही. आमच्या शेलटी वाडीतून गेली कमीतकमी दहा वर्षे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे फक्त रस्त्याचीच मागणी करत आहोत. बाकी आम्हांला काहीच नको. ही एकच समस्या अजून पर्यंत कोण दूर करु शकत नाही. येत्या 8 दिवसात आमची रस्त्याची मागणी पुर्ण न झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून आमच्या शेलटी वाडीतील सर्व ग्रामस्थ आणि महिला 1 मे रोजी उपोषणाला बसण्यार आहोत. अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने सुशील शेडगे माजी सरपंच यांनी दिली.

rapan bottom