मालवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मालवण शहरातील बांगीवाडा समाज मंदिर येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विरेश वळंजू, वैभव वळंजू, बाळा वळंजू, स्वच्छता मुकदम वळंजू उपस्थित होते.

