कांदळगाव देऊळवाडी परिसरातील घटना …
मालवण | प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील कांदळगाव देऊळवाडी येथील जयराम नारायण परब यांच्या घरा शेजारील जुने मोठे हापूस आंब्याचे कलम सायंकाळी कोसळले. या घटनेत घराच्या दर्शनी भागाचे तसेच घरा समोरील अंगणात उभी करून ठेवलेल्या मोटर सायकलचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.


कांदळगाव देऊळवाडी परिसरातील श्री जयराम परब यांच्या घरा शेजारी जुने मोठे हापूस आंब्याचे कलम मुळातून कमजोर झाले होते. हे झाड अचानक कोसळून परब कुटूंबियांच्या घराचे नुकसान झाले. काहीतरी कोसळत असल्याचा आवाज आल्याने येथील ग्रामस्थ जीवन कांदळगांवकर, जयवंत राणे, रोहन राणे, शांताराम चव्हाण, गीतेश कोदे यांनी घटनास्थळी धाव घेत परब कुटुंबियांची चौकशी केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी जयराम परब यांच्या घरासमोरील अंगणात उभी करून ठेवलेल्या मोटर सायकलचे आणि घराच्या दर्शनी भागाचे 50 हजार रुपये पर्यत नुकसान झाले आहे. कांदळगाव तलाठी यांनी घटनेचा पंचनामा करून नुकसानी ची नोंद केली.

