चाफेखोल ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणुक : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वतीने दोघांचाही सत्कार
मालवण : चाफेखोल ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे विभागीय पदाधिकारी अल्पेश निकम हे वार्ड क्रमांक 2 मधून तसेच त्यांच्या पत्नी अनया अल्पेश निकम वॉर्ड क्रमांक 1 मधून बिनविरोध विजयी झाले आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दोघांचाही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मंदार लुडबे, प्रमोद राणे, मुकुंद पार्टे, अंबाजी सावंत उपस्थित होते.
▪️ अमित खोत, मालवण

