बंटी सारंग ठरला सिंधुदुर्ग श्री २०२६ चा मानकरी
मंगेश नलावडे | मालवण : "सिंधुदुर्ग श्री २०२६" चा विजेता अर्थात मानकरी ठरलेल्या मालवण येथील बंटी सारंग यांचा मच्छिमार समाज आणि मच्छिमार सेल शिवसेना पक्षाच्या वतीने मच्छिमार आघाडी तालुका प्रमुख भाऊ मोरजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट,सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमानवान व्यायाम शाळा,कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने कांदळगाव येथे मानाच्या जिल्हास्तरीय रौप्य महोत्सवी "सिंधुदुर्ग श्री" स्पर्धेत नगरपालिका जिम, मालवणचा व्यायामपटू बंटी सारंग हा रौप्य महोत्सवी सिंधुदुर्ग श्री २०२६ चा मानकरी ठरला होता. श्री. बंटी सारंग यांच्या नेत्रदीपक यशाबद्दल मालवण तालुका शिवसेना मच्छिमार सेल च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बंटी सारंग यांनी शिवसेना मच्छिमार सेल आणि शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार केल्या बद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाज कल्याण सभापती सिद्धार्थ जाधव,नगरसेवक महेश कोयडे, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, शहर संघटक राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मच्छिमार आघाडी तालुका अध्यक्ष भाऊ मोरजे, शहर मच्छिमार सेल प्रमुख वसंत गांवकर,सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, नगरसेविका मेघा सावंत, बाल विकास उपाध्यक्ष अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर,भाई मांजरेकर, प्रशांत बिरमोळे, दाजी जोशी, बाबू तारी, अखिलेश शिंदे, मयू पारकर, अभय कदम, मयू पाटकर, मार्टिना फर्नांडिस, गणेश परब,यांसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

