युवासेना तालुका प्रमुख अभि लाड यांच्या सौजन्याने स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग व प्रगत विद्यामंदिर रामगड यांचे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग किर्लोस व प्रगत विद्यामंदिर रामगड हायस्कूल तसेच युवासेना तालुका प्रमुख अभि लाड यांच्या सौजन्याने माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सायकलिंग, लंगडी, कॅरम, बुद्धिबळ आदी शालेय क्रीडा स्पर्धा किर्लोस ब्रीज येथील गोकुळ गार्डन हॉल येथे आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेमध्ये 100 हुन अधिक मुलांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उदघाट्न युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड यांच्या हस्ते करण्यात आल. त्यासमवेत स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण कदम, रामगड हायस्कूल माजी मुख्याध्यापक वळजू सरं, रामगड सरपंच शुभम मठकर, परेश बाईत, तेजस घाडीगावकर, जयराम लाड, प्रशाला क्रीडा शिक्षक सावंत सरं, शिरवंडे प्रशाला मुख्याध्यापक तर्फे सर, फाटक सर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील मुला मुलींनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धेकांना मेडल, प्रमाणपत्र व टीशर्ट देऊन गौरवण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांना राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेता यावा या करीत स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग अध्यक्ष बाळकृष्ण कदम नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यांना आमच नेहमीच सहकार्य राहील. काही अडचणी असतील तर आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आपण नक्की मार्गी लावू. असे आश्वासन युवा तालुका प्रमुख अभि लाड यांनी दिले.


