जिल्हास्तरीय रौप्य महोत्सवी "सिंधुदुर्ग श्री" स्पर्धा : कांदळगांव येथे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमानवान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने कांदळगाव येथे आयोजित मानाच्या जिल्हास्तरीय रौप्य महोत्सवी "सिंधुदुर्ग श्री" स्पर्धेत नगरपालिका जिम, मालवणचा व्यायामपटू बंटी सारंग हा रौप्य महोत्सवी सिंधुदुर्ग श्री २०२६ चा मानकरी ठरला.
बेस्ट पोजर म्हणून अमित कदम, फ्युचर जिम, फोंडा व बेस्ट इम्प्रुव्ह म्हणून गणेश सातार्डेकर नगरपालिका जिम, मालवण याची निवड करण्यात आली. सावंतवाडी येथील सौरभ वारंग पुरस्कृत बेस्ट लेग-अमित कदम, बेस्ट चेस्ट- बंटी सारंग, आणि बेस्ट बॅक- गणेश सातार्डेकर यांनी सन्मान चिन्ह मिळवली.

स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक तथा मसुरे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दीपक परब, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उपाध्यक्ष दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपलक्ष्मी पडते, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, कांदळगाव सरपंच रणजित परब, उपसरपंच राजेंद्र कदम, सदस्य संतोष पारकर, विहार कोदे, सौ. शारदा मुळये. बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री. उमेश कोदे, राष्ट्रीय पंच श्री सुनील शेगडे, श्री. किशोर सोन्सुरकर, केंद्र प्रमुख तथा प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत पारकर, रामेश्वर देवस्थानचे सचिव श्री. संतोष परब, मालवण पं. स. सदस्य दीपक चव्हाण, बबन शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळस्कर, आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू खेळाडू अफरोज खान, संतान फर्नांडिस, दाजी सावजी, संतोष पालव, ओझर विद्यामंदिर शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत, सौ. पूजा देविदास वेरलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या २५ व्या रौप्य महोत्सवी स्पर्धेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली २५ वर्षे सतत यशस्वीरित्या "सिंधुदुर्ग श्री" या मानाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या अविरत आयोजनाबद्दल महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबईचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, बेस्ट शिव-हनुमान व्यायामशाळा, कांदळगावचे अध्यक्ष उमेश दिनकर कोदे, सचिव प्रवीण रमाकांत पारकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे गेली सुमारे २५ वर्षे ही "सिंधुदुर्ग श्री" शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अचूक मूल्यांकनाचे कार्य करून सहकार्य केल्याबद्दल राष्ट्रीय पंच किशोर शांताराम सोन्सुरकर यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. गेल्या २४ वर्षांमध्ये ज्यांनी "सिंधुदुर्ग श्री" हा मानाचा किताब मिळविला अशा सर्व माजी "सिंधुदुर्ग श्री" विजेत्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन दोन्ही संस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

दरम्यान कांदळगाव ग्रामपंचायतचे सदस्य विहार कोदे यांनी जिल्ह्यातील अधिकृत बॉडी बिल्डर संघटनेच्या अंतर्गत खेळणाऱ्या सर्व शरीरसौष्ठव पटूंना आमदार निलेश राणे साहेब यांच्या सहकार्याने विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून राष्ट्रीय पंच सुनील शेगडे, सहाय्यक किशोर सोन्सुरकर, सुधीर हळदणकर, विक्रांत गाड, अमोल तांडेल, हेमंत नाईक व महेश परब यांनी काम पाहिले.

गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-
५० ते ५० किलो वजनी गट- प्रथम क्रमांक- प्रथमेश पारकर, मसल फिटनेस, कुडाळ, द्वितीय- अंकित जाधव कुटाळकर फिटनेस, सावंतवाडी, तृतीय- अथर्व तेली पावर हाऊस जिम, कणकवली, चतुर्थ-अमोल तेली, सरवंजे फिटनेस, फोंडा, पंचम- प्रथमेश वाघमारे, पावर हाऊस जिम, कणकवली.
५५ ते ६० किलो वजनी गट-
प्रथम- भूषण गवंडी, फोर्ज फिटनेस, शिरोडा, द्वितीय- शेर बहादुर भोगटे, व्ही.एम.जीम, सावंतवाडी, तृतीय- आकाश नाईक, गौतम जिम, दोडामार्ग, चतुर्थ- शुभम हळदिवे, सरवंजे फिटनेस, फोंडा, पंचम-निहाल नाईक, बेस्ट जोकर फिटनेस, सावंतवाडी.
६० ते ६५ किलो वजनी गट-
प्रथम-गणेश सातार्डेकर, नगरपालिका जीम, मालवण, द्वितीय- मंगेश घोगळे, मसल पावर जिम, सावंतवाडी, तृतीय- साई तोरस्कर, पॉवर हाऊस जिम, कणकवली, चतुर्थ- गोपाळ कुलकर्णी, एम्पायर जिम, कुडाळ, पंचम- अमोल मोदी, रॉयल फिटनेस फोंडा.
६५ ते ७० किलो वजनी गट-
प्रथम- बंटी सारंग, नगरपालिका जीम, मालवण, द्वितीय -बाळा नार्वेकर, एम्पायर जिम, कुडाळ तृतीय- ओंकार बांदकर, नगरपालिका जीम, मालवण, चतुर्थ- सुभाष सज्जन, गिअर अप, कुडाळ, पंचम- महेश वाळके, पावरहाऊस जिम, कणकवली.
७० किलो वरील -
प्रथम- अमित कदम, फ्युचर फिटनेस, फोंडा, द्वितीय- ज्ञानेश्वर आळवे, गिअरअप जिम, कुडाळ, तृतीय- महादेव पंदारे, चतुर्थ- मनीष चव्हाण, मसल क्रिएशन मालवण, पंचम- हरिदास महाले, मसल क्रिएशन, मालवण.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बेस्ट शिव-हनुमान व्यायाम शाळेचे खजिनदार व नुकतेच पंच प्रमाणपत्र मिळालेले महेश परब, रामचंद्र गुरव, दादा परुळेकर, फोटोग्राफर जयेश सुर्वे, कांदळगावचे वायरमन प्रशांत मेस्त्री, आशिष आचरेकर, विश्राम राणे, मंडप डेकोरेटर्स मेस्त्री बंधू वेरली, युट्युब प्रसारण दामाजी मेथर, सहाय्यक ओंकार परब, वर्दम प्रिंटिंग प्रेसचे समीर वर्दम, मत्स्य व्यावसायिक ओंकार खांदारे, महेश वासुदेव कांदळगावकर, माजी सिंधुदुर्ग श्री कांदळगावचे सुपुत्र विशाल कसालकर, युवा सेना नेतृत्व प्रीतम गावडे, चौके, श्री गणेश सातार्डेकर, विराणी उमेश कोदे, सौ. अर्चना उमेश कोदे, कुडाळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रमोद काळसेकर, हॉटेल आराधनाचे मालक रमेश कांदळगावकर, संतोष कांदळगावकर, विश्राम राणे, सुनील परब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारकर यांनी केले, तर स्पर्धेचे सूत्रसंचालन किशोर सोनसुरकर यांनी केले.

