Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा १३, १४ एप्रिलला उत्साहात साजरा होणार…

श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा १३, १४ एप्रिलला उत्साहात साजरा होणार…

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

मालवण : मेढा-मालवण येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा १३ व १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक विधी, भजन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
१३ एप्रिल रोजी उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत धार्मिक विधी व 'त्रिशक्ती याग होम हवन' पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ (कांदळगाव देऊळवाडी) यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. यामध्ये बुवा राजेंद्र दिनकर कोदे हे भजन सादर करतील, तर त्यांना बंटी कांदळगावकर (मृदंग) आणि दत्ताराम डिंकावलकर (तबला) साथ देतील. रात्री ८ वाजता शंकर मंदिर मेढा मालवण महिला मंडळ प्रस्तुत 'रंगमेळा' हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल.



१४ एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत सत्यनारायण महापूजा होईल, त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता 'अष्टपैलू कलानिकेतन' यांचा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम होणार असून, गायक सुनील परुळेकर आपली कला सादर करतील. उत्सवाची सांगता रात्री ८ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ (म्हापण, वेंगुर्ला) यांच्या पौराणिक दशावतारी नाटकाने होईल. या सर्व मंगल सोहळ्यास भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ, मेढा, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

rapan bottom