Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सिंधुदुर्ग जिल्हा सब ज्युनिअर बास्केटबॉल संघ निवड चाचणी १६ एप्रिल रोजी मालवणात

सिंधुदुर्ग जिल्हा सब ज्युनिअर बास्केटबॉल संघ निवड चाचणी १६ एप्रिल रोजी मालवणात

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित ५१ वी सब ज्युनिअर गटातील राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा ३ मे ते ८ मे या कालावधीत सातारा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनतर्फे जिल्हा स्तरावरील निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
ही निवड चाचणी १६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. कुडाळकर हायस्कूल, मालवण येथील बास्केटबॉल मैदानावर पार पडणार आहे. इच्छुक खेळाडूंनी वेळेत उपस्थित राहून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी पात्रता निकषांनुसार खेळाडूंचा जन्म ०१ जानेवारी २०१३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेदरम्यान खेळाडूंनी जन्म प्रमाणपत्र व आधारकार्ड ची मुळप्रत व इतर कागदपत्रे सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव अजय मधुकर शिंदे (मो. ९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे.

rapan bottom