श्री देव भुतनाथ व्हॉलीबॉल संघ वायरी भुतनाथ आयोजित सेमी शूटिंग हॉलिबॉल स्पर्धा
मालवण : श्री देव भुतनाथ व्हॉलीबॉल संघ वायरी भुतनाथ आयोजित सेमी शूटिंग हॉलिबॉल स्पर्धा २०२६ या मानाच्या स्पर्धेत जय हनुमान सर्जेकोट संघ विजेता ठरला. आहे. जय हनुमान सर्जेकोट संघाला उद्योजक केदार झाड पुरस्कृत रोख रक्कम रुपये ७७७७ व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथील श्री देव भूतनाथ मंदिर पटांगणात जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या नाइट सेमी शूटिंग हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच भगवान लुडबे आणि उद्योजक केदार झाड यांच्या हस्ते करण्यात आला.

थरारक रंगलेल्या अंतिम सामन्यात जय भूतनाथ वायरी संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. डी सी सी वायरी आणि उद्योजक वैभव सावंत यांच्या कडून पुरस्कृत रोख रक्कम रुपये ५५५५ आणि आकर्षक चषक देऊन उपविजेता वायरी संघाला गौरविण्यात आले. कळसुली संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या संघाला अद्विक वाक्कर यांस कडून पुरस्कृत रोख रक्कम २००० व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. पडेल संघ चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला या संघाला विहान चव्हाण पुरस्कृत रोख रक्कम २००० व आनंद हडकर, लीलाधर झाड पुरस्कृत आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत उत्कृष्ट लिफ्टर सुदेश परकर, उत्कृष्ट शुटर बाबल गिरकर, उत्कृष्ट सर्व्हिसमेन मयूर (कळसुली संघ), उत्कृष्ट नेटमन दिपक ढोलम आणि शिस्तबंध संघ म्हणून भोगनाथ कळसुली यांना पारितोषिकांनी गौरविण्यात आले.
▪️अमित खोत | मालवण

