Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

ऑलिव्ह रिडले या समुद्री कासावाची एकूण ९५ पिल्ले अंड्यांमधून बाहेर

ऑलिव्ह रिडले या समुद्री कासावाची एकूण ९५ पिल्ले अंड्यांमधून बाहेर

मालवण वायरी भूतनाथ किना-यावरुन कासवांची पिल्ले सुरक्षित अधिवासात

स्थानिक कासव मित्रांनी कांदळवन कक्षाच्या मदतीने पिल्लांना सुखरुप समुद्रामध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले

राहुल जाधव | मालवण :- दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वायरी भूतनाथ समुद्र किनाऱ्यावर स्थानिक रहिवासी लतिका प्रशांत पाटकर यांना समुद्री कासव अंडी घालण्यासाठी समुद्र किनारी आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच युथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेला याची कल्पना दिली. संस्थेचे सदस्य तेथे दाखल झाले. त्यांनी पाहिले असता ते ओलीव्ह रिडले या प्रजातीचे समुद्री कासव असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच कांदळवन विभागाला संपर्क करून याची कल्पना दिली.

बीच मॅनेजर मार्फत तिथून ११४ अंडी रेस्क्यू केली.अंड्यांच्या सुरक्षितेसाठी व देखभालीसाठी कांदळवन कक्षाच्या नियंत्रणा खाली त्या अंड्यांना वायरी भूतनाथ येथील समुद्री कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते.

मालवण वायरी भूतनाथ समुद्र किनारा येथील कांदळवन विभाग - दक्षिण कोंकण (वनपरिक्षेत्र मालवण ) समुद्री कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये ऑलीव्ह रिडले या समुद्री कासवाची अंडी सुरक्षितरित्या सांभाळण्याचे काम चालू होते.

दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी जवळपास ५२ दिवसांच्या कालावधी नंतर ऑलिव्ह रिडले या समुद्री कासावाची एकूण ९५ पिल्ले रात्री १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास अंड्यामधून बाहेर पडल्याचे तेथील स्थानिक रहिवासी कासव मित्र श्रीकांत माडये यांच्या निदर्शनास आले, त्यांनी त्वरित कांदळवन विभागाला संपर्क केला. स्थानिक कासव मित्रांनी कांदळवन कक्षाच्या मदतीने पिल्लांना सुखरुप समुद्रामध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

या वेळी गणेश माडये, रसिका माडये, युगा माडये, संजू भगत, अमर मातोंडकर, विनय मातोंडकर, सौरभ मातोंडकर उपस्थित होते.

rapan bottom