Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळसंचालित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शतक महोत्सव सोहळा

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळसंचालित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शतक महोत्सव सोहळा

माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती : कलाविष्कार प्रदर्शनाचे उद्घाटन

मालवण | प्रतिनिधी : कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचालित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालायाच्या (संस्था) शतकोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संवाद साधला. यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शतक महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

शतकोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कलाविष्कार या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांनी केले. यावेळी कलाकार दिपक भोगटे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्रांचा आस्वाद त्यांनी घेतला.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेच्या शतक महोत्सवास प्रारंभ झाला. शतक महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार आणि माजी विद्यार्थी श्री. प्रभाकर वाईरकर, वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर, आणि आजी - माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित चित्र व रांगोळी प्रदर्शनाचे तसेच स्टॉलचे उदघाटन माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), ऍड. एस. एस. पवार तसेच संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, संस्थेचे सचिव सुनील नाईक व श्रीमती विजयश्री देसाई स्कुल कमिटीचे चेअरमन सुधीर वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, साबाजी गावडे, महेश वाईरकर, श्रुती वराडकर, स्वाती वराडकर, आनंद टेमकर, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कुलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, अविनाश जठार आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. यावेळी मंत्री आशिष शेलार यांचा संस्थेचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त) यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री शेलार यांनी चित्र आणि रांगोळी प्रदर्शनाचे विशेष कौतुक केले.

शतकोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या महिला बचत गटांच्या स्टॉलचे उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांनी केले. यावेळी विविध स्टॉलला भेट देऊन, भगिनींना शुभेच्छा दिल्या.

rapan bottom