मेढा काळबादेवी मंदिर मार्गांवर वीज वाहिन्या तसेच मार्गांवरील झाडी हटवली : नागरिकांची समस्या मार्गी

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा येथील काळबादेवी मंदिर मार्गांवर वीज खांब व वीज वाहिन्यावर तसेच मार्गांवर मोठया प्रमाणात झाडी वाढल्याने वीज समस्या निर्माण होत होत्या. याबाबत उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांचे बाबू धुरी व धुरी परिवार यांनी लक्ष वेधले. दरम्यान, दिपक पाटकर यांनी वीज वितरण व मालवण नगरपरिषद यांच्या माध्यमातून झाडी तोडून वीज वाहिन्या मोकळ्या केला. वीज समस्या दुरु केल्या.
उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी तात्काळ समस्या सोडवली याबाबत बाबू धुरी, शिवाजी केळूसकर, संदीप धुरी तसेच धुरी परिवार यांनी आभार व्यक्त केले. तसेच वीज वितरण ठेकेदार गोवेकर व मालवण नगरपरिषद कर्मचारी यांचेही आभार मानले आहेत.

