Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

गोवा व देवगड येथील एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

गोवा व देवगड येथील एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

या हंगामात एलईडी मासेमारी विरुद्ध दहावी मोठी कारवाई

मालवण | प्रतिनिधी : मालवण समोरील समुद्रात गोवा व देवगड येथील एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई केली असून नौका ताब्यात घेतल्या आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

मालवण समुद्रात संयुक्त गस्तीत LED मासेमारी करणाऱ्या दोन नौका जप्त करण्यात आल्यामुळे अवैध LED मासेमारीविरुद्ध विभागाची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. मागील आठवड्यात देखील गोवा आणि रत्नागिरी येथील नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्याच्या हंगामात ही LED मासेमारीविरुद्धची दहावी मोठी यशस्वी कारवाई आहे.

बुधवार 8 एप्रिल रोजी रात्री मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी प्र. ला. महाडवाला, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, कि. मा. वाघमारे, परवाना अधिकारी, देवगड व ग. शं. टेमकर, परवाना अधिकारी, मालवण हे मालवण समोर समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी देवगड येथील परवाना असलेली नौका चित्रा-१ नों. क्र.- IND-MH-५-MM-६८५ व अक्राजे (Acranje) नों. क्र.- IND-GA-१-MM-३९६२ द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना पकडले. या दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण अंदाजे ३५-४० खलाशी आहेत. सदर नौका जप्त करून देवगड बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवरील LED लाईट सामग्री जप्त करण्यात आली आहे.

वादळी वारे आणि उंचच उंच लाटांच्या थरारक पार्श्वभूमीवर मालवण समुद्रात संयुक्त गस्ती दरम्यान अंमलबजावणी अधिकारी अंमलबजावणी अधिकारी श्री. प्र. ला. महाडवाला, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, श्री. कि. मा. वाघमारे, परवाना अधिकारी, देवगड व श्री. ग. शं. टेमकर, परवाना अधिकारी, मालवण यांच्या पथकाने सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण व देवगड यांचे सहकार्याने श्री. सागर कुवेसकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे.

rapan bottom