तळाशील समोर वाळू उत्खननास परवानगी मिळणार नाही
किनारा सुरक्षेच्या दृष्टीने बंधाऱ्यासाठी 6 कोटी 55 लाख निधी ही मंजूर
ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे व्यक्त केले आभार
मालवण | प्रतिनिधी :
कालावलं खाडी पात्रात तळाशील समोर नोटिफाईड स्पॉट ठिकाणी वाळू उत्खननास परवानगी नाहीच आणि मिळणारही नाही. ज्या अनधिकृत वाळू उपसा बोटींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे त्या बोटींवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासोबतच खाडीपात्रात साचलेला गाळ काढला जाईल. तळाशील किनारा सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना केल्या जातील. यां सोबतच तळाशील बंधाऱ्यासाठी 6 कोटी 55 लाख निधी मंजूर झाला असून प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. लवकरच वर्क ऑर्डर होऊन काम सुरू होईल. असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी तळाशील ग्रामस्थांना दिले. तसेच आम्ही सर्व तळाशील ग्रामस्थांच्या ठामपणे सोबत असल्याचेही स्पष्ट केले. आमदार निलेश राणे यांच्या आश्वासनानंतर गेल्या सहा दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडलेल्या तळाशील ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.

अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात तळाशील ग्रामस्थांच्या आंदोलन स्थळी आंदोलन आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी आमदार निलेश राणे यांच्या समवेत जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, नायब तहसीलदार प्रिया हर्णे, पतन विभागाचे अधिकारी, उप जिल्हाप्रमुख महेश राणे, शिवसेना विभाग प्रमुख संतोष कोदे, जिप सदस्य वर्षां सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, जयहरी कोचरेकर, संजय केळूसकर, संजय तारी, तालुका संपर्कप्रमुख पिंट्या गावकर, नगरसेवक रविकिरण तोरसकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी, भाऊ हडकर, मुजफ्फर मुजावर, अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर, मनोज हडकर, भाऊ मोरजे, पंकज आचरेकर व अन्य उपस्थित होते.
आमदार निलेश राणे म्हणाले कालावल खाडीमध्ये तळाशील समोरील भागात वाळू उपसा होणार नाही. हा भाग नोटिफाईड स्पॉट आहे याठिकाणी वाळू उत्खनन परवानगी मिळणार नाही. याची मी हमी देतो. वाळूच्या ज्या अनधिकृत होड्या आढळून आल्या व पळून गेल्या त्या संशयीतांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रशासन, पालकमंत्री खासदार, आमदार आम्ही सर्व ग्रामस्थांबरोबर आहोत. आपण ग्रामस्थ महिला आंदोलन करतं आहात आपल्याला त्रासही झाला आपण आंदोलन थांबवावे. प्रशासन लोकप्रतिनिधी आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले. आ ल. निलेश राणे यांची ठोस भुमिका व आश्वासन नंतर तळाशील ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.

6 कोटी 55 लाख निधीतून बंधारा मंजूर
ग्रामस्थांनी आमदार राणे यांच्याकडे बंधरा लवकर पूर्ण होण्याची मागणी केली. आमदार निलेश राणे म्हणाले सहा कोटी ५५ लाख निधीतून बंधारा मंजूर झाला आहे. बांधऱ्याची प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच वर्क ऑर्डर होऊन काम सुरू होईल असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार निलेश राणे यांचे आभार मानते.

