Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिलला कणकवलीत भव्य सोहळा

खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिलला कणकवलीत भव्य सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांची “लाईव्ह कॉन्सर्ट"'

अभिनेते संजय दत्त राहणार उपस्थित

पुष्पगुच्छ नको, पुस्तके भेट द्या..! ती पुस्तके ग्रामीण ग्रंथालयांना भेट देणार


चांगल्या पुस्तकांचे स्टॉल लावून पुस्तके उपलब्ध करून देणार


वर्षभर राबविणार अमृत महोत्सवी पदार्पण उपक्रम

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

कणकवली : सर्वांचे नेते, माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिल रोजी साजरा केला जात आहे.त्यांचे हे अमृत महोत्सवी म्हणजेच ७५ व्या वर्षात पदार्पण आहे. यानिमित्त पुढील वाढदिवसापर्यंत अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तर वाढदिवसानिमित्त १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. वाढदिवसाला प्रसिद्ध सिनेअभिनेते संजय दत्त उपस्थित राहणार असून सोहळ्यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांची 'लाईव्ह कॉन्सर्ट' कोकणवासीयांना बघायला मिळणार असल्याचे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित नाईक ,भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,कणकवली सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, जि. प. सदस्य मनोज रावराणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बँक संचालक प्रकाश मोरेये,भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, कणकवली शहर अध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.

अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष राबवणार

प्रभाकर सावंत म्हणाले, कोकणात विशेषतः जिल्ह्यात जे सण उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस देखील साजरा केला जातो. कारण, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. त्यांचा ७४ वा वाढदिवस यावेळी होत असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. म्हणूनच आम्ही अमृत महोत्सवी पदार्पण सोहळा यावर्षी राबवत आहोत. त्यानिमित्त वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. दर महिन्याच्या १० तारीखच्या दरम्यान हे उपक्रम संबंध रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राबविले जाणार आहेत. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते ,राणे यांचे हितचिंतक आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकही सहभागी होतील असे सावंत म्हणाले.

पुष्पगुच्छ नको, पुस्तके द्या..!

राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता उपजिल्हा रुग्णालय समोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आम्ही आवाहन करतो की, खासदार नारायण राणे यांना पुष्पगुच्छ भेट देण्यापेक्षा पुस्तक भेट द्या. ही पुस्तकांची भेट सोहळ्याच्या प्रवेशद्वारावरच स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. हजारो पुस्तके या निमित्ताने संकलीत होतील. ही पुस्तके विविध ग्रंथालयांना देण्यात येणार आहे. कोकणातील वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी हा यामागचा उद्देश आहे, असेही सावंत म्हणाले.

विशेष आसन व्यवस्था

नारायण राणे कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित असणारे नेते नाहीत. राणे यांनी चार दशके कोकणाची सेवा केली आहे. सहाजिकच त्यांच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय मंडळी उपस्थित असतात त्यामुळे विशेष निमंत्रण देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. या विशेष निमंत्रितांना आसन व्यवस्था देखील केली जाणार असल्याचे सावंत म्हणाले.

संजय दत्त, सोनू निगमची उपस्थिती

या सोहळ्यास प्रसिद्ध सिनेअभिनेते संजय दत्त हे देखील उपस्थित राहणार आहेत. तर सोहळ्यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांची लाईव्ह कॉन्सर्ट देखील कोकणवासीयांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती प्रभाकर सावंत यांनी दिली.

rapan bottom