खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त मालवण तालुका शिवसेनेचा सामाजिक उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त मालवण तालुका शिवसेना यांच्या वतीने रिक्षा चालकांचा 2 लाखाचा विमा उतरविण्यात येणार आहे. रिक्षा चालकांनी मामा वरेरकर नाट्यगृहा समोरील शिवसेना शाखा मालवण येथे ९ एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी. असे आवाहन मालवण तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार श्री नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिनानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा च एक भाग म्हणून मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने रिक्षा चालका साठी 2 लाखाचा विमा उतरविला जाणार आहे. पहिल्या १०० रिक्षा चालकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. विमा धारक हा 60 वर्षाच्या आतील असावा, अपघाती मृत्यू झाल्यास विम्याची 100 टक्के रक्कम, अपघात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विम्याची 100 टक्के रक्कम, विमा धारकास मिळणार आहे.
विमा उतरविण्यासाठी मोबाईल नंबर, आधारकार्ड झेरॉक्स, वारस आधारकार्ड झेरॉक्स, आवश्यक आहे. अधिक माहिती साठी निलेश लुडबे 9404737708, संकेत राऊळ 7499697698 राजा मांजरेकर 8421679218, विठू वराडकर 7219838844 यांच्याशी संपर्क साधावा. या विम्याचे वितरण 10 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता शिवसेना शाखा मालवण येथे होणार आहे. रिक्षा चालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मालवण तालुका शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

