Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे व युवराज चौगुले आदी उपस्थित होते.


मंत्री राणे म्हणाले, एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होत असलेली मासेमारी रोखण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी दिल्या पाहिजेत, असे सांगत या कामासाठी विभागाने अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.


या बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती प्रक्रिया, सागरी किनाऱ्यावरील ९१ अतिसंवेदनशील लँडींग पॉईंट्सवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक नेमणे आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत "सागर मित्र" नेमणुकीसंदर्भातही आढावा घेण्यात घेण्यात येऊन संबंधित यंत्रणांना याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

rapan bottom