Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मालवण शहरातील अंगणवाडीच्या वेळेत बदल करा

मालवण शहरातील अंगणवाडीच्या वेळेत बदल करा

महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांची मागणी

उन्हाचा तडाखा लक्षात घेता पंचायत समिती प्रशासनास निवेदन

मालवण | प्रतिनिधी : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांना लेखी निवेदन सादर केले आहे.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, विजय निकम, नगरसेविका महानंदा खानोलकर, महिमा मयेकर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत मालवण शहरात एकूण आठ ठिकाणी अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये प्रामुख्याने ३ ते ६ वयोगटातील लहान मुले शिक्षणासाठी येतात. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाही अंगणवाड्यांची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. भर दुपारी सुट्टी होत असल्याने लहान मुलांना या कडाक्याच्या उन्हातून घरी जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

सौ. आचरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी साधारणतः १ एप्रिलपासून अंगणवाड्यांची वेळ बदलून ती सकाळी ८.३० ते ११.३० अशी केली जाते. मात्र, यंदा एप्रिल महिना सुरू होऊनही अद्याप वेळेत बदल का करण्यात आला नाही? याबाबत प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नाही.
उच्च तापमान असतानाही लहान मुलांना दुपारी २ वाजेपर्यंत अंगणवाडीत थांबावे लागणे हे त्रासदायक आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांच्या हितासाठी वेळेत बदल करावा अशी मागणी अन्वेषा आचरेकर यांनी केली आहे.

वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अंगणवाड्यांची वेळ सकाळच्या सत्रात करावी, जेणेकरून मुले ऊन वाढण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील. असे निवेदनात म्हटले आहे.

rapan bottom