Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

हिंदू म्हणून एक आहोत हाच विचार रुजला पाहिजे : डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

हिंदू म्हणून एक आहोत हाच विचार रुजला पाहिजे : डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

मालवणात सकल हिंदू संमेलन उत्स्फूर्त उत्साहात संपन्न

मालवण | प्रतिनिधी : हिंदू धर्म जाती जाती मध्ये अडकून पडला आहे. जात नव्हे तर हिंदू म्हणून आपण एक आहोत हाच विचार आपल्यामध्ये रुजला पाहिजे. हिंदू म्हणून आपण एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी मालवण येथे सकल हिंदू संमेलनात बोलताना केले.


सकल हिंदू समाजाच्या वतीने मालवण वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे सकल हिंदू संमेलन संपन्न झाले. या संमेलनाचे उदघाटन सेवानिवृत्त सैनिक राजन कुमठेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा प. पू. कलावती माता संप्रदायच्या पद्मजा कुडाळकर व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाले. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, हिंदू संमेलनाचे संयोजक ऍड. पलाश चव्हाण, सहसंयोजक सौ. शिल्पा गाड आदी उपस्थित होते. ऍड. पलाश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.


यावेळी विविध नृत्ये, गीत सादर होऊन भोंदू बाबा विषयी जागृती निर्माण करणारी नाटिका सादर झाली. यावेळी गोसेवक, सर्पमित्र यांच्यासह सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रवीणकुमार ठाकरे म्हणाले, पर्यावरण, संस्कृती, देशाभिमान अशा विविध गोष्टींमधून आपण आपल्या हिंदू धर्माची जपणूक केली पाहिजे, देशासाठी जगायला शिकले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी माजी सौनिक राजन कुमठेकर व पद्मजा कुडाळकर यांनीही हिंदू धर्माबाबत, देश सेवेबाबत तसेच अध्यात्मिक विचार मांडले. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले, आभार अविनाश कोळंबकर यांनी केले. यावेळी बहुसंख्येने हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होते.

rapan bottom