Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढतोय...

प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढतोय...

पालकमंत्र्यांच्या जनता संवाद कार्यक्रमात तक्रारी कमी ; विकास कामांच्या मागण्यांचा सूर जास्त


सिंधुनगरी | प्रतिनिधी :- पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या भेटीगाठी संवादात नागरिकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. या संवादात ५० निवेदने प्राप्त झाली. यापूर्वी शंभर दीडशे निवेदने येत होती यावेळी मात्र ती संख्या घटली असल्याचे दिसून आले. यावेळी विकास कामांशी संबंधित मागण्यांची निवेदने अधिक होती.एकूणच, या संवादातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.विशेष म्हणजे ज्यांच्या समस्या मागील संवाद कार्यक्रमात सुटल्या गेल्या अशा नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आभारी मानले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या दालनात गेलेले घेतलेल्या या संवाद कार्यक्रमांमध्ये नागरिक, शिक्षक, संस्थाचालक, कंत्राटी कर्मचारी, आधी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आधी उपस्थित होते.

प्राप्त निवेदनांवर तत्काळ दखल घेत पालकमंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत अनेक प्रश्न मार्गी लावली. यावेळी शिक्षकांच्या संच मान्यतेचा विषय मंत्रालयातील बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निकाली काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावर नागरिकांना विश्वासात घेऊनच तो मार्गी लावला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नाबाबतही सकारात्मक भूमिका घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. यासंदर्भातील निवेदनावरही निर्णय घेण्यात आला. याशिवाय काही अतिक्रमणांचे प्रश्न, तसेच विविध विकास कामांच्या मागण्यांबाबतची निवेदने स्वीकारण्यात आली. यावेळी सभापती नितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, सावी लोके, भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शिंदे शिवसेना अध्यक्ष दामू सावंत आधी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

rapan bottom