Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची अवैध एलईडी मासेमारी नौकांवर धडक कारवाई सुरूच

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची अवैध एलईडी मासेमारी नौकांवर धडक कारवाई सुरूच

अवैध एलईडी मासेमारीचे साहित्य असलेली गोवा राज्यातील नौका ताब्यात ; शनिवारी पहाटे निवती समोरील समुद्रात कारवाई

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने निवती समोरील समुद्रात अवैध एलईडी मासेमारीचे साहित्य असलेली गोवा राज्यातील नौका ताब्यात घेतली आहे. नौकेवर नौका तांडेलसह २० खलाशी असून सदर नौका जप्त करून पुढील कारवाईसाठी सर्जेकोट बंदरात आणली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय एलईडी पर्ससीन नौकेवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने दिली आहे.

सिंधुदुर्ग, मालवण मत्स्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवार 4 एप्रिल रोजी पहाटे 3.45 च्या सुमारास निवती समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) व सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर हे नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्यातील श्रीमती पल्लवी साईहर्षद धोंड, रा. पणजी गोवा यांची नौका जय IV बॉस , नों.क्र.IND-GA-२-MM-3588 ही नौका महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रातून आवागमन करताना निदर्शनास आली, त्यावेळी नौकेच्या कागदपत्राची तपासणी करिता नौका पाठलाग करून थांबविली असता नौकेवर विधीग्राह्य कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे सदर नौकेची तपासणी केली असता नौकेवर अवैध/अनधिकृतरित्या LED मासेमारीचे साहित्य आढळले. या नौकेवर नौका तांडेलसह इतर 20 खलाशी आहेत. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे.

अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) व सहाय्यक मत्स्य. विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांचे सहकार्याने सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मा.सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण यांचे न्यायालयात ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती मा.सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग विभागाकडून देण्यात आली आहे.

rapan bottom