Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात अनधिकृत मासेमारीवर सर्वात जास्त कारवाई

मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात अनधिकृत मासेमारीवर सर्वात जास्त कारवाई

नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी आकडेवारीच केली सादर

मालवण | प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यउद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात अनधिकृत मासेमारी वर मागील दहा वर्षातील सर्वात जास्त कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आकडेवारी स्पष्ट करत भाजपा मच्छिमार आघाडी माजी जिल्हा संयोजक तथा स्वीकृत नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी माहिती दिली.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, सिंधुदुर्गच्या किंबहुना कोकणच्या किनारपट्टीला अनधिकृत मासेमारीच्या त्रास गेले 40 वर्षे चालू आहे. स्थानिक तसेच परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर, अनधिकृत पर्ससीन व एलईडी मासेमारी अनधिकृत रित्या महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रामध्ये करतात. अनधिकृत मासेमारीवर मत्स्य उद्योग खाते कारवाई करीत असते. मत्स्यउद्योग मंत्री नितेश राणे यांनी २०२४ मध्ये मत्स्यउद्योग मंत्रालयाचा कारभार हाती घेतला त्यानंतर कारवाईचा वेग वाढला आहे. सन २०२५ - २६ मध्ये दहा वर्षातील सर्वात जास्त म्हणजे ८५ नौका वर अनधिकृत मासेमारी साठी कारवाई झाली. ज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे रुपये १ कोटी ४७ लाख दंड वसूल करण्यात आला जो मागील दहा वर्षातील सगळ्यात जास्त रक्कम आहे. २०१६ ते २०२६ या कालावधीत झालेल्या ५२५ कारवाई पैकी तब्बल १३६ कारवाई ह्या मत्स्य उद्योग मंत्री श्री.नितेश राणे यांच्या कारकिर्दी मध्ये करण्यात आल्या. त्याचप्रमाणे बोटीवरील एलईडी लाइट्स व इतर प्रतिबंधित साहित्य जप्त करण्यात आले. ड्रोन सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान अनधिकृत मासेमारी वर लक्ष ठेवण्यासाठी आणल्यामुळे बऱ्याच अंशी अनधिकृत मासेमारीवर आळा बसला.
महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधिक्षेत्रामध्ये अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणणे लवकरच शक्य होईल. वेगवान गस्ती नौका हा विषय अंतिम टप्प्यात असून लवकरच कोकण किनारपट्टीवर वेगवान गस्ती नौका गस्त सुरू होईल. तसेच मत्स्य खात्यामध्ये रिक्त कर्मचारी यांची नियुक्ती सुध्दा लवकरच होईल. त्यानंतर स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष सुद्धा पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल.
महाराष्ट्र मासेमारी नियमन कायद्यातील बदल त्याला आधुनिक तंत्रज्ञान व मंत्री नितेश राणे यांच्या राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळत असल्यामुळे लवकरच अनधिकृत मासेमारीवर अंकुश येईल. एलईडी व परप्रांतीय मासेमारी बद्दल राज्य शासन गांभीर्याने पावले उचलत आहेत त्यामुळे पारंपरिक मच्छीमार यांना न्याय मिळेल. असे भाजपा मच्छिमार आघाडी माजी जिल्हा संयोजक तथा स्वीकृत नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी स्पष्ट केले.

rapan bottom