Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रम

सामाजिक समता कार्यक्रम अंतर्गत मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रम

मालवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती याचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी, व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे पुस्तक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पुस्तक वाचन उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी, वाचक नागरिक सहभागी होऊ शकतात. 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता साने गुरुजी वाचन मंदिरामधील वाचनालयातील वाचकांच्या आवडीचे पुस्तक वाचनासाठी दिले जाईल. वाचकांनी दिवसभराच्या कालावधीत हे पुस्तक वाचायचे आहे. पुस्तक वाचून झाल्यावर पुस्तकाविषयीचे मनोगत वाचकांनी व्यक्त करायचे आहे. वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी तसेच महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमातील सहभागी वाचकांना पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुस्तक वाचन उपक्रमात जास्तीत जास्त वाचक आणि सहभागी व्हावे असे आवाहन समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, बार्टी व बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क लक्ष्मीकांत खोबरेकर (बॅ. नाथ पै सेवांगण कार्यवाह -9422946212),संग्राम कासले (मालवण समतादूत- 9420824874),ऋतुजा केळकर (ग्रंथपाल - 9420423790).

rapan bottom