२ एप्रिल रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
रात्री १० वाजता श्री गणेश शुभगा विवाह दशावतारी नाटक
मालवण | प्रतिनिधी : मालवण वायरी भूतनाथ रेवंडकरवाडी येथील निळकंठ म्हस्कर यांच्या प्रांगणातील मारुती मंदिरात २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात पहाटे ५ वाजता ह.भ.प.श्री.प्रभूदास आजगांवकर यांचे हनुमान जन्माचे कीर्तन,सकाळी ६.३३ वाजता हनुमान जन्म, सकाळी ७ वाजता महाआरती,सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महा प्रसाद, सायंकाळी ४ ते ६ संगीत संध्या, सायंकाळी ६ वाजता उमेश मेस्त्री यांचा गीत रामायण कार्यक्रम, ७.३० वाजता भजनी बुवा नाना सामंत यांचे भजन, रात्री १० वाजता हनुमान दशावतार नाट्य मंडळ यांचा गणेश शुभगा विवाह हा नाट्य प्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन वायरी भूतनाथ रेवंडकर वाडी आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

